Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रताप बरडे सरांचा सपत्निक सत्कार

करमाळा प्रतिनिधी पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव ता.करमाळा जि सोलापूर या विद्यालयातील शिक्षक श्री. प्रताप रंगनाथ बरडे सर राज्य स्तरीय आदश॔ शिक्षक पुरस्कार निमीत्ताने रावगांव ग्रामपंचायत व रावगांव ग्रामस्थ यानी प्रताप बरडे सर व पत्नी सौ.विद्या बरडे या दोघांचा करमाळा आमदार संजय मामा शिदे, माजी आमदार जयवंतराव जगतापसाहेब यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब, गटशिक्षणाधिकारी साहेब ,सुजित तात्या बागल, रावगांवचे सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच विष्णू गरजे,भास्कर पवार, पंचायत समिती सदस्य राहूल भाऊ सावंत, विलास मुळे, सव॔ ग्रामपंचायत सदस्य व रावगांव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व नागरिक या कार्यक्रमांकासाठी उपस्थित होते . पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष काकडे साहेब, संस्थेचे सचिव भैयासाहेब काकडे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद साळुंके सर,मुख्याध्यापक श्री.विजय कोळेकर सर, परदेशी सर, सरडे सर, रासकर सर, लांडगे मँडम, सुरेश बरडे, दादा कांबळे इत्यादी सर्वजण यांनी अभिनंदन केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group