Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाचा केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी   मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाचा केंद्र व राज्य शासनाचा जाहिर निषेध करून विविध मागण्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, सदर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज करमाळा यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. या मागणीचे निवेदन येथील सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, मुख्यमंत्री व सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, सदर निवेदन येथील तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कालपर्यंत झालेल्या सर्व भरती प्रविण्यामध्ये फुलपट्टी लावून न तपासता आलेल्या सर्व जाहिराती याचा आधार धरून सर्वाना शासकिय सेवेत तात्काळ समावून घेण्यात यावे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षेचे फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता E.w.s.ओपन करावेत व त्यांना वर्ग श्रेणी बदलण्याचा अधिकार द्यावा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या भरवश्यावर प्रवेश मिळालेला आहे. ज्यांनी प्रवेश घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने फी मध्ये सवलत द्यावी व इतर आरक्षणाप्रमाणे ५० % राज्य सरकारने भरावी, ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत लागू शकत नाही, अशांना विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात यावे. तसेच मराठा आरक्षणामध्ये न्यायालयाने दिलेल्या स्थगिती १६/४ प्रमाणे इंदिरा साहनी खटल्याचा दाखला देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण हे १५/४ प्रमाणे सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासलेले असल्याने देण्यात आलेले आहे या करिता राज्य सरकारने तात्काळ पाच न्यायमूर्तीच्या खंडपिठाकडे स्थगिती करण्याची मागणी करावी, सारथी संस्थेला भरघोस आर्थिक मदत करण्यात यावी, आण्णासाहेब पाटील महामंडळा मार्फत होणाऱ्या कर्ज प्रकरणाबाबत बँकाना सुचना देण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असुन या सर्व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही या निवेदनात दिला आहे. सदर निवेदनावर सकल मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाजबांधव कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत. याप्रसंगी मराठा समाजाचे विविध मान्यवर व कार्यकर्ते समाजबांधव  उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group