करमाळा शहर व तालुक्यात १४ सप्टेंबर रोजी ६२ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात १४ सप्टेंबर रोजी एकूण ३१९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.यामध्ये ६२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ४० पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. करमाळा शहरात १७६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह. गुजरगल्ली १ पुरुष कुंकू गल्ली ३ पुरुष, १ महिला शिवाजीनगर १ पुरुष, १ महिला जाधव प्लॉट १ पुरुष ,बागवान नगर ५ पुरुष, ३ महिला ,मार्केट यार्ड १ पुरुष ,चांदगुडे गल्ली १ महिला ,राशीन पेठ १ पुरुष, १ महिला मेनरोड २ पुरुष, २ महिला,कमलाई नगर १ पुरुष ,सिंचननगर १ महिला ,कानाडगल्ली १ पुरुष यांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात १४३ ॲंटिजिन रॅपिड टेस्टमध्ये ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पिंपळवाडी १ पुरुष ,कोळगाव १ पुरुष ,कुंभेज १ पुरुष, ३ महिला दाहींखिंडी १ पुरुष ,वीट ३ पुरुष, ५ महिला साडे ३ पुरुष पोफळज १ पुरुष, मोरवड १ पुरुष ,वांगी नं.१ (पुरुष) ,पांगरे १ पुरुष शेटफळ ४ पुरुष, ४ महिला असुन आज ३३ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ८३६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४९० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३४८ वर जावून पोहोचली आहे.
