करमाळाताज्या घडामोडीराजकीय

शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत आवताडे यांच्यासह सरपंच , उपसरपंच यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश                                         

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख भरत आवताडे यांच्यासह फिसरे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा आ.संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश व पूर्वभागातील शेतकरी मेळावा तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता फिसरे येथे होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.या कार्यक्रमाला करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भारत अवताडे , फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके , ग्रामपंचायत सदस्य विजय आवताडे , सदस्य हनुमंत रोकडे , सदस्य गणेश ढावरे यांचेसह विविध मान्यवरांचा आ. संजय शिंदे गटात प्रवेश होणार आहे .फिसरे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रवेशामुळे आ. शिंदे गटाला पूर्व भागात बळकटी मिळणार असून त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group