Friday, October 2, 2026
Latest:
करमाळा

9 बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये आज 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व एन.सी.सी. कॅडेटने गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेटला मार्गदर्शन करताना 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांनी सांगितले की यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अनेक कॅडेटची RDC व TSC कॅम्पसाठी निवड होत आहे. या महाविद्यालयात प्रत्येक कॅडेट प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो व त्यांचा चांगला प्रतिसाद असतो. त्याचबरोबर महाविद्यालयातील कॅडेटचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. तसेच हे महाविद्यालय भौतिक सुविधाने संपन्न आहे असे गौरवउद्गार काढून महाविद्यालयातील कॅडेटचे व महाविद्यालयाचे कौतुक केले.मान्यवरांचा सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये संपन्न झाले. यावेळी त्यांच्या सोबत सुभेदार मेजर ग्यानबहादूर गुरुंग, ट्रेनिंग जे .सी .ओ बंडू गळवे,हवालदार मच्छिंद्र शेंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, ले .डॉ . विजया गायकवाड, सी .टी.ओ. निलेश भुसारे आणि एन .सी.सी. कॅडेट उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!