Friday, August 21, 2026
Latest:
करमाळा

पुणे येथील आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनचे उज्ज्वल यश

करमाळा प्रतिनिधी 
पुणे येथील भोसरी येथे १८ जानेवारी रोजी अरिस्टो किड्स यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशन अंतर्गत मुथा अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मुथा अबॅकस अकॅडमीचे ४२ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या दहा मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. अनेक विद्यार्थ्यांनी चार ते पाच मिनिटांत ही गणिते अचूक सोडवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
अबॅकस लेव्हल फिफ्थमध्ये श्रावणी महेश गवळी हिने द्वितीय क्रमांक तर सई विनोद पडवळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. अबॅकस लेव्हल थर्डमध्ये रिदम भूपेंद्र बोराडे याने तृतीय क्रमांक मिळवला. अबॅकस लेव्हल फर्स्टमध्ये अनुष्का ब्रह्मदेव नलवडे हिने प्रथम क्रमांक, तर शौर्य संभाजी शिंदे याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
अबॅकस लेव्हल झिरो (ज्युनिअर गट) मध्ये जेऊर इरा पब्लिक स्कूलच्या वीरप्रताप सूर्यकांत चौधरी याने चतुर्थ क्रमांक मिळवला, तर शिवांजय उमेश सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला. सीनियर गटात अक्षता माधव कदम हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.
मुथा नॉलेज फाउंडेशनचा मास्टर जीनियस विद्यार्थी सार्थक मकरंद वनारसे याने अबॅकसचे सर्व दहा लेव्हल पूर्ण केल्याबद्दल त्याला ‘मास्टर ऑफ अबॅकस’ ही पदवी, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन कन्वोकेशन पदवीदान समारंभात गौरविण्यात आले.
याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शायनिंग स्टार अवॉर्ड व रनर-अप अवॉर्ड प्रदान करण्यात आले. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थापिका ज्योती मुथा तसेच वनारसे मॅडम, सावंत मॅडम, गौरी मॅडम व दिपाली मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. याच कार्यक्रमात मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा यांना ‘बेस्ट अकॅडमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
करमाळा प्रतिनिधी पुणे येथील भोसरी येथे १८ जानेवारी रोजी अरिस्टो किड्स यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशन अंतर्गत मुथा अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मुथा अबॅकस अकॅडमीचे ४२ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या दहा मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. अनेक विद्यार्थ्यांनी चार ते पाच मिनिटांत ही गणिते अचूक सोडवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
अबॅकस लेव्हल फिफ्थमध्ये श्रावणी महेश गवळी हिने द्वितीय क्रमांक तर सई विनोद पडवळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. अबॅकस लेव्हल थर्डमध्ये रिदम भूपेंद्र बोराडे याने तृतीय क्रमांक मिळवला. अबॅकस लेव्हल फर्स्टमध्ये अनुष्का ब्रह्मदेव नलवडे हिने प्रथम क्रमांक, तर शौर्य संभाजी शिंदे याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
अबॅकस लेव्हल झिरो (ज्युनिअर गट) मध्ये जेऊर इरा पब्लिक स्कूलच्या वीरप्रताप सूर्यकांत चौधरी याने चतुर्थ क्रमांक मिळवला, तर शिवांजय उमेश सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला. सीनियर गटात अक्षता माधव कदम हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.
मुथा नॉलेज फाउंडेशनचा मास्टर जीनियस विद्यार्थी सार्थक मकरंद वनारसे याने अबॅकसचे सर्व दहा लेव्हल पूर्ण केल्याबद्दल त्याला ‘मास्टर ऑफ अबॅकस’ ही पदवी, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन कन्वोकेशन पदवीदान समारंभात गौरविण्यात आले.
याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शायनिंग स्टार अवॉर्ड व रनर-अप अवॉर्ड प्रदान करण्यात आले. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थापिका ज्योती मुथा तसेच वनारसे मॅडम, सावंत मॅडम, गौरी मॅडम व दिपाली मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. याच कार्यक्रमात मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा यांना ‘बेस्ट अकॅडमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!