राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा 23 फेब्रुवारी रोजी करमाळ्यात
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेब यांनी सुरू केलेली राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा 23 फेब्रुवारी रोजी करमाळ्यात होत आहे. संवाद कार्यकर्त्यांशी… पक्षाच्या केंद्रबिंदूशी या उपक्रमांतर्गत दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी करमाळा येथे सकाळी 11:30 वाजता आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय, बायपास रोड करमाळा येथे आढावा बैठक संपन्न होत आहे.
या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर, सोलापूरचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे ,तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या आढावा बैठकीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
