करमाळा

श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावरील केलेली दंडात्मक कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने. देविदास साळुंखे

 

करमाळा प्रतिनिधी  श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावरील केलेली दंडात्मक कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने. करण्यात आली आहे असे मत ऊस उत्पादक शेतकरी कोंढारचिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की मा. साखर आयुक्त साहेब पुणे यांनी श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर गाळप परवाना न घेता कारखाना चालू केल्या प्रकरणी पाच कोटी दंडाची केलेली कारवाई ही चुकीची असून शेतकरी सभासदांवर अन्याय करणारी आहे. मकाई कारखाना हा कै. दिगंबररावजी बागल मामा यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी सन 2001-2002 सालि उभा केलेला असून या साखर कारखान्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले असून चालू वर्षी कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन माननीय श्री दिग्विजय भैय्या बागल यांनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून कारखाना पूर्ण क्षमतेने चालू केलेला आहे. व त्या साखर कारखान्याने 2200 ते 2500 चे प्रतिदिन गाळप करून जवळपास दोन लाखाचे यशस्वी गाळप पूर्ण केलेले आहे. सदर कारखान्या विषयी माहिती देताना मा.देविदास साळुंके यांनी सांगितले की सदर कारखान्याने मागील गळीत हंगामातील एफ आर पी ची संपूर्ण रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे . तेव्हा साखर आयुक्त साहेब यांनी केलेल्या दंडाच्या कारवाई च्या विरोधात कारखाना प्रशासनाने रीतसर माननीय सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल करून सदर दंडाची माफी माननीय सहकार मंत्री व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून घ्यावी. त्यासाठी श्री मकाई कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या शुभेच्छा पाठीशी असतील याबाबतची दखल शासन निश्चितपणे घेईल याची मला खात्री आहे. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी कारखान्याबाबत चुकीच्या अफवा पसरल्या आहेत. चालू गळीत हंगामात मकाई कारखान्याने जिल्ह्यातील सर्वात जास्त 2200/- रुपये प्रथम ऊस बिल हप्ता सभासदांच्या खात्यावर वेळेत जमा करत आहे. तेव्हा दंडाची माफी निश्चितपणे शासन करील.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group