यशाची नवी क्षितीजे शोधण्यासाठी कौतुकाची थाप प्रेरणा देते- प्रा.गणेश करे-पाटील.
.करमाळा प्रतिनीधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे मूल्य हे शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या यशाच्या तुलनेत खूपच मोठे असते. कारण ग्रामीण भागातील मुलांना पुरेशा भौतिक सुविधा नसतात.तरीही आपण सर्वांनी उज्वल यशापर्यंत झेप घेतली आहे.त्यामुळेच या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम यशकल्याणी संस्था करत आहे. हे कौतूक आपला उत्साह वाढविण्यासाठी आणि यशाची नवी क्षितीजे शोधण्यासाठी आहे. असे उद्दगार प्रा.गणेश करे-पाटील यांनी मनोगतातून व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.ते वीट येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च विद्यालयाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते.यावेळेस कु.तन्मय महादेव जगदाळे या विद्यार्थ्याची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना यशकल्याणी परिवाराकडून व विद्यालयाकडून मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळेस तन्मय जगदाळे यांनी मार्गदर्शन करताना कठोर मेहनत,अखंड वाचन आणि सरावाच्या जोरावर यश खात्रीने मिळते असे मत मांडले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्ञभैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव डि.बी.ढेरे म्हणाले की आईवडीलांच्या व शिक्षकांच्या कष्टाची जाण ठेवून, प्रगती करावी.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एस.व्ही कोळकर म्हणाले की राष्ट्र उभारणीत शिक्षक हे महत्त्वपूर्ण योगदान देत असतात,विद्यार्थी घडले तरच समाजाची प्रगती होते.यावेळेस गुणवंत विद्यार्थी म्हणून कु.क्षिरसागर हनुमंत विठ्ठल,कु.नेहा किरण ढेरे, कु.गौरी राजेंद्र सोनटक्के ऋतुजा रवींद्र भोसले,कु.अनिता डिगांबर जाधव,कु.कोमल ब्रह्मदेव बागडे, कु.आरती रेवन्नाथ बनकर, कु.समृद्धी राजेंद्र भुजबळ, कु.धनराज निलचंद दुरंदे ,कु.सोनाली लहू कोल्हे,कु.निकिता जालिंदर जाधव,कु.रमेश रबरब्या काळे या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख ढेरे यांनी केले तर आभार मारूती किरवे सरांनी मानले.
