अत्याधुनिक सुविधांनी लवकरच सुसज्ज होणाऱ्या जाधव पाटील हॉस्पिटलचा 18 फेब्रुवारी रोजी नवीन इमारतीमध्ये भव्य शुभारंभ – संतोष जाधव पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर रोहन पाटील पॅथालाॅजी लॅब तज्ञ सून डॉक्टर शिवानी पाटील यांच्या जाधव हॉस्पिटल जिजाऊ पॅथालाजी लॅब व पाटील मेडिकल या नूतन वैद्यकीय सेवांचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता करमाळा अर्बन बँकेशेजारी मेनरोड करमाळा येथे होणार असल्याची माहिती आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन संतोष जाधव पाटील यांनी दिली आहे. या जाधव हॉस्पिटलचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेसाहेब यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार राज्यमंत्री लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख असुन या कार्यक्रमाला करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार नारायण आबा पाटील, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, अकलूजचे प्रसिद्ध डॉक्टर मनोहर इनामदार, बारामतीचे डॉक्टर रमेश भोईटे, बार्शीचे प्रसिद्ध डॉक्टर संजय अंधारे, डॉक्टर बी वाय यादव साखर सहसंचालक डॉक्टर संजय भोसले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माऊली शुगर चे चेअरमन व्हि.पी. पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे साहेब, डॉ.अमोल डुकरे , करमाळयाचे तहसीलदार समीर मानेसाहेब, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, गोपाळ सावंत उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या नवीन वैद्यकीय सेवा शुभारंभ कार्यक्रमास शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील, संतोष जाधव पाटील, डॉ.रोहन पाटील, डॉ. शिवानी पाटील, अभिजीत जाधव पाटील, अजिंक्य जाधव पाटील तसेच जाधव पाटील परिवाराच्यावतीने करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन करमाळा मेडिकल गिल्ड असोशियन यांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या दोन तीन वर्षांत जनतेच्या आशिर्वादाने अत्याधुनिक सुविधां जाधव पाटील हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले आहे.
