भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जिल्हा नियोजन मधून करमाळा तालुक्यासाठी 48 लाख रुपयेची कामे केली मंजूर
करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांची गेल्या महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली, आणि अवघ्या एक महिन्याच्या आत गणेश चिवटे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा व नागरी सुविधा अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 48 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे,
यामध्ये खडकेवाडी येथे गाव अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण, भालेवाडी येथे आरो प्लॅन्ट, तसेच वीट, करंजे, रोशेवाडी, मोरवड, पिंपळवाडी, वंजारवाडी, हिवरवाडी, देवळाली, हिसरे, फिसरे येथे गाव अंतर्गत वाडी वस्त्यांवरील रस्ते मंजूर करून आणले आहेत,
पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे,
या पुढेही करमाळा तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,
गणेश चिवटे यांनी ग्रामीण भागातील गरजेचे रस्ते मंजूर केल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
