करमाळाराजकीयसकारात्मक

कात्रज येथे झालेला भ्याड हल्ला निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची शिवसेनीची मागणी-महेश चिवटे शिवसेना उपजिल्हाप्रमुख

 

करमाळा प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे माजी मंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांच्यावर कात्रज येथे झालेला भ्याड हल्ला निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करमाळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली या आशयाचे निवेदन तहसीलदार समीरजी माने व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख संजय आप्पा शिलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, कोळगावचे शिवसेना शाखाप्रमुख नागेश चेंडगे पाटील, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर संजय जगताप राजेंद्र मेरगळ संजय भोसले प्रदीप बनसोडे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेेेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारी शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मान्य झाली नसती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शिवसेना वाचवायचे असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाय पर्याय नाही संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून त्यांच्या कामाचा सपाटा व वेग पाहून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे भगवे उपरणे पांघरून आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रकार केला आमदार सावंत यांना वाय दर्जाची सुरक्षा असताना पोलिसा समक्ष त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला हा प्रकार निंदनीय असून या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. माननीय उद्धव ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांनी सारखे एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांना गद्दार म्हणणे चुकीचे असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ठाकरे कुटुंबाबद्दल हृदयात असलेला मानसन्मान यामुळे आजपर्यंत कुणीही त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाहीत मात्र संयमाचा बांध सुटल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक जशास तसे उत्तर देतील त्यावेळी मात्र ठाकरे कुटुंबांची प्रचंड मानहानी होईल यामुळे आजही शिंदे समर्थक आमदार खासदार ठाकरे कुटुंब यांना दैवत मानत आहेत त्याचे देव पण त्यांनी जपून ठेवावे व विचाराची लढाई विचाराने करावी असे असे मत यावेळी महेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group