आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 5 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आ. संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय ( कॉटेज ) येथे दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी भव्य शिबिराचे आयोजन केले असून आ. संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वाढदिवस समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 31 जुलै रोजी आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस असतो .या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा केलेला आहे .यामध्ये रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी ,वृक्षारोपण ,वह्या वाटप, नेत्र तपासणी आदी उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल अशी माहितीही वाढदिवस समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार संजय मामा शिंदे उपस्थित राहणार असून याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते ,नेते उपस्थित राहणार आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, तहसीलदार श्री समीर माने, पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे या मान्यवरांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर होणार असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
