Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील पुनर्वसन गावातील विविध समस्यांबाबत ४ डिसेंबरला आमदार. संजयमामा शिंदे व सर्व विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत करमाळ्यात महत्वपुर्ण बैठक


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्त, कोळगाव धरणग्रस्त , तसेच मांगी, दहीगावं प्रकल्प यासह पुनर्वसनाचे विविध समस्यां बाबत ची महत्वपुर्ण बैठक सोमवार दिनांक-४/१२/२०२३ रोजी करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात पार पडणार असुन, याबाबतची अधिकृत माहीती जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब यांनी पत्रासह प्रसिद्धीस दिली आहे. डिसेंबर ४ रोजी पुनर्वसन गावातील सर्व नागरिक बंधु-भगिनींनी व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन देखिल आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहुन आपले गावोगावी प्रलंबित असणारे विविध नागरी सुविधा बाबत मागणी करावी.पुनर्वसन गावातील रस्ते, गटारी, पाण्याचे, आरोग्याचे, विजेचे संदर्भातील अनेक समस्या व तक्रारी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे प्राप्त झालेवरून आमदार महोदयांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून व पत्रव्यवहार करून याबाबत तातडीने अपुर्ण कामे व नवीन प्रस्तावित कामांसाठी ही महत्वपुर्ण बैठक अधिकाऱ्यांचे उपस्थित घेतलेली असुन यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group