Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

बागल गटाचे राजकारणातील हरीश्चंद्र

 

सत्य युगामध्ये राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेला शब्द सत्यात एकनिष्ठतेने खरा करून दाखवला. अशी आख्यायिका आपणा सर्वांनाच माहित आहे. याच पद्धतीने बागल गट हेच सर्वस्व मानून नेता सांगेल तीच दिशा म्हणून आपल्या राजकीय कामाची वाटचाल करणारे पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र (दादा) झिंजाडे.

हरिश्चंद्र आनंदा झिंजाडे यांचा जन्म पोथरे तालुका करमाळा येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पोथरे येथे झाले तर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये झाले पहिल्यापासून समाजकारणाची राजकारणाची आवड असल्याने बागल गटाची व माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या समवेतच राजकारणाची दिशा त्यांनी घेतली पुढे मामांच्या निधनानंतर माजी आमदार शामलताई बागल या आमदार झाल्यानंतर त्यांनी तीन 3 जून 2010 साली माजी आमदार शामलताई बागल व माजी मंत्री राम शिंदे यांचा एकाच व्यासपीठावर भव्य नागरिक सत्कार करून राजकारणात ते सक्रिय झाले. पुढे 2015 साली पोथरे ग्रामपंचायतची निवडणूक लागली महिला आरक्षण असल्याने त्यांच्या पत्नी सौ. जयाताई हरिश्चंद्र झिंजाडे यांना उमेदवारी देण्यात आली बागल गटाच्या सहकार्याने भरघोस मताने जनतेने निवडून देऊन सरपंचपदी त्यांची वर्णी लागली‌ बागल गटाच्या सहकार्यामुळे पाच वर्ष सरपंच पद यशस्वीपणे सांभाळून जनतेची सेवा करण्याचे काम त्यांनी केले आहे. गावातील महत्वाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. गावाच्या एकात्मतेसाठी व गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गट तट राजकारण विरहित व सामाजिक सलोखा जपण्यासाठी गणेशोत्सव जयंती सण , उत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी शिवरत्न मंडळाची स्थापना करून युवकाचे संघटन उभा करण्याचे काम केले आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही जनतेप्रती असणारा कळवळा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणुसकीचा धर्म पाळणारे हरिश्चंद्र दादा झिंजाडे यांचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ,मनमिळाऊ हे अजातशत्रू व्यक्तिमत्व असून विरोधकांनाही आपलेसे वाटणारे हरिश्चंद्र दादा झिंजाडे यांनी राजकारणाच्या पलीकडे माणुसकीचे नाते जपत बागल गटात राहुन जेष्ठ नेते मंडळी व तरुण मंडळीचा संवाद घडवुन पोथरे गावातील तरुण पिढी बागलमय करण्याचे काम केले आहे. जनसेवेचे काम करत करत जनतेला न्याय देण्याचे काम करत असताना आपली कौटुंबिक जबाबदारी तेवढी समर्थपणे पेलण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या जीवनामध्ये मोठे वादळ आले. अचानक त्यांना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीमध्ये हरिश्चंद्र झिंजाडे यांनी केवळ जनतेची व बागल गटाचे काम करण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांना दोन अपत्ये असून थोरली कन्या नेहा ही पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे .तर मुलगा मोहित हा इयत्ता आठवी मध्ये महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे शिकत आहे.बागल गटाचे प्रामाणिकपणे काम करून नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून बागल गटाचे काम अविरतपणे करत आहेत.
यावेळी हरिश्चंद्र झिंजाडे म्हणाले की, बागल गट हेच आपले सर्वस्व आहे. गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलास घुमरेसरांच्या मार्गदर्शनाखाली गटाचे सर्व उपक्रम, राजकीय निवडणुका, गटाचे जबाबदाऱ्या आपण सक्षम पणे पूर्ण वेळ देऊन सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group