रावगाव येथे नवीन 33/11kv सबस्टेशन साठी तांत्रिक मंजुरीचे आदेश आमदार संजयमामा शिंदे
रावगाव प्रतिनिधी .करमाळा मतदारसंघातील मौजे रावगाव येथे नवीन 33 /11 kv ,5 MVA क्षमतेचे नवीन सबस्टेशनसाठी तांत्रिक मंजुरीचा आदेश प्राप्त झालेला असून या नवीन सबस्टेशनच्या उभारणीमुळे रावगावसह पंचक्रोशीतील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की , करमाळा मतदार संघातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मतदारसंघातील मूलभूत रस्ते ,पाणी आणि वीज या प्रश्नांच्या बाबतीत आपण पायाभूत स्वरूपाचे काम करत असून आत्तापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या 3 वर्षात 33 /11 K V क्षमतेची 5 नवी उपकेंद्रे मंजूर करून घेतलेली आहेत .यामध्ये कात्रज ,दहिगाव, दहिवली, म्हैसगाव, आवाटी यांचा समावेश आहे. तसेच कोर्टी व पांडे येथील उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव मंजूर झालेले असून त्याचे काम सुरू आहे. नव्याने वांगी नं.2, सौंदे ,राजुरी व पोमलवाडी या ठिकाणी नवीन सबस्टेशन सुरू करण्यासाठी, तसेच कविटगाव येथील उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
चौकट –
2014 पासून आम्ही रावगाव ग्रामस्थ नवीन सबस्टेशन साठी प्रयत्नशील होतो. सुरुवातीला पुरेसा लोड नाही या कारणास्तव सदर प्रस्ताव मंजूर झाला नाही .त्यानंतर 5 वर्षांपूर्वी आम्ही फेर प्रस्ताव सादर केला तो प्रस्तावही प्रलंबित होता. अखेर आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर सबस्टेशन मंजूर झालेले असून रावगावसह वंजारवाडी ,लिंबेवाडी व भोसे या गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठबळामुळेच हे होऊ शकले .या दोघांचेही आम्ही रावगाव ग्रामस्थ ऋणी आहोत…
श्री.दादासाहेब जाधव – सरपंच, रावगाव
