खोलेश्वर महादेव मंदिरासमोर पाऊसामुळे चिखलाचे साम्राज्य नगरपालिकेने सुविधा देण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील राजेरावरंभा काळातील पुरातन खोलेश्वर महादेव मंदिरासमोर पाऊसामुळे तसेच मंदिरासमोर पक्का रोड क्रांकीटकरण केले नसल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सध्या श्रावण महिना चालु असल्यामुळे लिंगायत कोष्टी समाजाच्यावतीने शिवसप्ताहाचे आयोजन केले असुन पाऊसामुळे चिखल झाल्यामुळे भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे पावसाचे पाणी महादेव मंदिरामध्ये व मंदिर परिसरात सगळीकडे गाळ, चिखल, पाला, पाचोळा सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व श्रावण महिना चालू असल्यामूळे भाविक भक्तांना दर्शनासाठी येण्यास अडचण येत आहे.तरी नगरपालिकेच्यावतीने मुरूम टाकुन त्याची डागडुजी करावी अशी मागणी भाविंक भक्त भक्तांनी केली आहे.
