Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळयात गणेशविसर्जन मिरवणूक ही गुलाल,फटाके डाॅल्बी मुक्त काढण्याचा सामाजिक कार्यकर्त्यानी दिला सायकल रॅलीद्वारे दिला संदेश

करमाळा प्रतिनिधी गणेशविसर्जन मिरवणूक ही गुलाल,फटाके व डाॅल्बी मुक्त काढावी असे अवाहन येथील ग्राम सुधार समिती व अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा करमाळा यांच्या वतीने सायकल रॅली काढून प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन केले आहे.
यावेळी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन मिरवणूक काढण्याचे अवाहन करण्यात आले आहे. यात प्राचार्य नागेश माने, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, दिगंबर साळुंके, ग्रामसुधारचे अध्यक्ष ॲड.डाॅ. बाबूराव हिरडे, अंधश्रद्धा निर्मूल चे कार्याध्यक्ष अनिल माने तसेच कलाकार समशेर व सलीम शेख, राजाभाऊ साने, शिक्षक संतोष माने, बाळासाहेब दुधे , हरीभाऊ पिंपळे, रोहन माने, ॲड. आकाश मंगवडे, डी.जी.पाखरे आदीजण या रॅलीत सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन चे ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.आर.गायकवाड यांचेमार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
छत्रपतीशिवाजी तरूण मंडळाच्यावतीने अॅड. राहूल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांनी रॅलीचे स्वागत केले.
रॅलीचा समारोप यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या आवारात करण्यात आला . यावेळी यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सन्मान केला. यावेळी डाॅ. हिरडे व श्री.करे-पाटील यांनी समारोपाचे भाषण केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group