Thursday, April 17, 2025
Latest:
आरोग्यसकारात्मक

CM एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मंगेश चिवटेच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील भिगवनमध्ये पहिल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन!

भिगवण | रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्याला अनुसरून मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख, मा मंगेश चिवटेच्या तसेच कक्ष प्रमुख रामहरी सर आणि माउली धुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असताना ग्रामीण भागात रुग्णांपर्यंत पोहचविण्याचा दृष्टीने आज मंगेश चिवटे यांच्या करमाळा येथे होत असणाऱ्या नागरी सत्काराच्या दिवशी ग्रामीण भागात भिगवणमध्ये भिगवण-राशीन रोड येथे कार्यालयाचे उदघाटन मोठ्या दिमाखात अनेक कार्यकर्त्यांच्या आणि रुग्णसेवकांच्या उपस्थिती व मा. राज्यमंत्री बच्चू कडू आणि समक्ष मंगेश चिवटे यांच्या हस्ते भिगवनमध्ये पार पडले.

यावेळी पुणे जिल्ह्यातील व आसपासच्या रुग्णांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या, खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि कक्षेच्या माध्यमातून जवळपास 200-300 लोकांना मदतीसाठी केलेली शिफारपत्रे आणि ज्या रुग्णांना मदत भेटली आहे अश्या पत्रांची फाईल दाखवण्यात आली, यावेळी बच्चू भाऊंनी आणि मंगेश चिवटे यांनी कामाचे कौतुक केले. या कार्यालयातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे, पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहायक विशाल धुमाळ, भिगवण शहर वैद्यकीय सहाय्य्क राहुल ढवळे, सुरज पुजारी व इंदापूर-बारामती-दौंड वैद्यकीय सहाय्यक सागर बनसोडे रुग्णांपर्यंत माहीती पोहचविण्याचे काम करणार आहेत.
तसेच कार्यक्रमाला भिगवण गावातील ग्रामस्थ, आरोग्यसेवक आणि सामाजिक कार्यात काम करणाऱ्या लोकांनी व असंख्य मित्रपरिवाराने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मंगेश चिवटे साहेबांच्या कामाचेही गावकर्यांनी कौतुक केले.

यापुढे कोणताही रुग्ण उपचाराविना राहून न देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधीची योजना गरजू रुग्णांपर्यंत कशी पोहचवता येईल व महात्मा ज्योतिबा फुले योजना, सिद्धिविनायक ट्रस्टची मदत आणि पंतप्रधान योजना यांचीही माहिती सोबत धर्मादाय हॉस्पिटलची माहिती या कार्यालयातून लोकांपर्यत पोहचविण्याचे काम योग्य रीतीने करण्यात येणार आहे. असेही यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group