अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे. या सेवाभावी संस्थेच्या वतीने करमाळा शहरातील हिरडे प्लॉट,वेताळपेठ, दिपनगर, कृष्णाजीनगर. आणि करमाळा तालुक्यातील बिटरगांव(श्री) येथील समाजातील वंचित लोकांना किराणा किटचे वाटप
करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील सालसे येथील अभिनव समाजसेवा मंडळ सालसे या सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील वंचित दुर्लक्षित अंध, गोरगरीब
अपंग,वयोवृद्ध ,निराधार,कलावंत अशा 100 महिला व पुरुषांना किराणा किट चे वाटप करण्यात आले या किट मध्ये हरभरा दाळ, आटा,मीठ,तेल, तांदूळ,मिर्च पावडर,हळद पावडर या बाबींचा समावेश होता या किटचे वाटप अॅड.बाबूराव हिरडे,अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, सचिव योगेश जगताप, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे,प्रकल्प समन्वयक नामदेव दळवी, बिटरगाव चे सरपंच सुनिता शिवाजी मुरुमकर , शंकर दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना महामारी च्या काळात संस्थेने आजअखेर 1449 लोकांना किराणा किट चे वाटप केले आहे या कार्यक्रमासाठी गौतम दळवी,विकास मुरूमकर,गहिनीनाथ दळवी,नागेश शेळके ऊपस्थित होते. किराणा किट वाटपासाठी अनिता राठोड,तेजस अंधारे, दिपक इंदुरे, माधुरी राठोड,संजय राठोड यांनी परिश्रम घेतले.