Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

रायगडचे अधिक्षक अशोक दुधे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार पांडे शाळेसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर

करमाळा प्रतिनिधी                                             पांडे येथील रहिवासी असलेले व सध्या रायगडचे पोलीस अधीक्षक असलेले अशोक दुधे यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला.यावेळी श्री.दुधे यांनी  पांडे शाळेसाठी पाच लाख रूपयाची मदत जाहीर केली आहे. श्री.दुधे हे रायगडचे पोलीस अधीक्षक झाल्यानंतर प्रथमच पांडे गावी आले होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, उद्योजक राजेश दुधे, पत्रकार दस्तगीर मुजावर, व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालया समोर भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते.
यावेळी नवनाथ दुधे, विकास भोसले, संपत कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अधीक्षक  दुधे यांनी गावातील युवकांना स्पर्धा परिक्षा विषयी मार्गदर्शन केले. तसेच आपण ज्या शाळेत सातवी पर्यंत शिकलो त्या जिल्हा परिषद प्राथमीक शाळेची पहाणी केली व शाळेच्या कामासाठी पाच लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच गावातील दिगंबररावजी बागल सार्वजनिक वाचनालयला भेट देऊन गावातील युवक अधिकारी घडावा म्हणून स्पर्धा परिक्षा व एम पी सी चे पुस्तके ऊपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजेश दुधे,पत्रकार दस्तगीर मुजावर, ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, संपत कुंभार, वाचनालयाचे सचिव विकास भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!