त्रिपुरामध्ये काहीही घटना घडली नसताना दंगलीच्या निषेधार्थ भाजपा करमाळा तालुक्याच्या वतीने निषेध
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार बदे साहेब यांना निवेदन देण्यात आले, त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला, यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे म्हटले की
जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे.
या संदर्भात आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत –
१. त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे.
२. ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे
३. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे
४. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी.५. भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत,या मागण्या करण्यात आल्या .यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे ,,युवा मोर्चाचे दीपक चव्हाण, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे , तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, दादा काळे, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष कमलेश दळवी, मनोज मुसळे, गणेश माने, संदीप काळे ,गिरीश वाशिंबेकर ,विनोद शिंदे ,कमलेश गोसावी आदीजन उपस्थित होते,
