करमाळा

करमाळा तालुक्यातील अकरा गावातील बांधकाम कामगारांनी मध्यान भोजन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा-गणेश भाऊ चिवटे

करमाळा – प्रतिनिधी मौजे- पिंपळवाडी येथे बांधकाम कामगारांना मध्यांन भोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी मध्यांन भोजन योजनेचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा भाजपचे अध्यक्ष तथा सोलापूर dpdc सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील 11 गावातील बांधकाम कामगारांना आजपासून मध्यान भोजन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेनुसार बांधकाम (कामगारांना दुपारचे जेवण चपाती,भात,भाजी, लोणचे ) त्यांच्या गावात मिळणार आहे.तरी जास्तीत जास्त कामगारांनी यां योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, दिपक गायकवाड, आतिष पाटील, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, नितीन झिंझाडे, गणेश महाडिक, पवार व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group