दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस आनंदात साजरा
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय राणा दादा सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व दत्तकला सीबीएसई स्कूल यांनी संयुक्तिकरित्या साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधून स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट खाऊ वाटप करण्यात आला. लहान मुलांच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग करण्यात आला. लहान मुलांनी वाढदिवसाचे गीत गायले व दादांना शुभेच्छा दिल्या .दिवसभर विद्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले .वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अवकाशातील सर्व ग्रहांचे दर्शन व्हावे यासाठी विद्यालयात कृत्रिम तारांगणाची उभारणी करण्यात आली होती .यामध्ये आकाशातील ग्रहताऱ्यांपासून समुद्र तळातील सागरी जीवसृष्टी थ्रीडी तंत्रज्ञान इत्यादी साकारण्यात आले होते. मुलांनी याचा आनंद घेतला या कार्यक्रमाला दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सचिव प्राध्यापिका माया रामदास झोळ संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विशाल बाबर संस्थेच्या डायरेक्टर प्राचार्य सौ नंदा ताटे प्राचार्य सिंधू यादव उपस्थित होत्या.
