टायगर ग्रुपच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी पंधराव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
करमाळा प्रतिनिधी टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष मा. श्री.उमेश भाऊ पोखरकर यांच्या वाढदिसानिमित्त करमाळा टायगर ग्रुप संपर्क कार्यालय येथे राष्ट्रिय अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते मोफत गोरगरीबांच्या सेवेकरिता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित करमाळा तालुका पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब, जी.प. सदस्य बाळासाहेब मस्के, पत्रकार महेश चिवटे, नानासाहेब मोरे, पत्रकार नासीर कबीर भिगवण माजी सरपंच मोहन शेठ शेंडगे, व मराठवाडा येथील टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते..
