जागतिक अपंग दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील शहरातील दिव्यांग बंधूंचा गौरव सन्मान सोहळा
करमाळा प्रतिनिधी जागतिक अपंग दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती सेना यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील व शहरातील अपंगाचा दिव्यांग बंधूंचा गौरव सन्मान सोहळा संत गोरा कुंभार समाज भवन कुंभारवाडा येथे करण्यात आला. यावेळी पंच्याहत्तर दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपंगांना आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी माणसातील देव माणूस बच्चुभाऊ कडू यांनी स्वातंत्र्य अपंग मंत्रालय निर्माण केले असून अपंगांना न्याय देण्यासाठी आमदार बच्चुभाऊ अहोरात्र काम करीत आहे .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खऱ्या अर्थाने दिव्यांगांना न्याय देण्याचे काम केले असून त्यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला असुन पेढे वाटुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला
या कार्यक्रमात दिव्यांग बंधू गोरखनाथ जाधव श्री रवींद्र गलांडे मोहन माने प्रवीण सरडे समीर बागवान यांनी अपंगांना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार दिव्यांग अपंग संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी केले होते.अल्पोउपहारव चहा पाण्याची व्यवस्था सविताताई वाघमारे वंचित बहुजण आघाडीचे जिल्हा संघटक विलास कांबळे यांनी केली होती. या कार्यक्रमास अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
