अंजनडोह येथील बिनविरोध सरपंच शेळके यांचा भाजपा संपर्क कार्यालय येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी मौजे अंजनडोह येथील ग्रामपंचायत ही भाजप ,बागल ,जगताप व पाटील गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बिनविरोध केली आहे.ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी भाजपा मागासवर्गीय युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंत रणदिवे यांनी व बागल ,जगताप ,पाटील या गटाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ही ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे , यावेळी नूतन सरपंच शेळके यांचा भाजपा संपर्क कार्यालय येथे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले, या सत्कार समारंभावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव तसेच अंजनडोह येथील अरुण आण्णा शेळके, सुभाष काका बोलदोटा, हाजीत रणदिवे ,अशोक शेळके ,अरुण जाधव, धनराज शिंदे, बाबुराव शेळके, नवनाथ शेळके, अमोल शेळके, आनंद साळुंखे, दीपक शेळके, संतोष भोसेकर, मोहम्मद सोनवणे, संतोष पिसाळ ,रंगनाथ शेळके व ग्रामस्थ आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
