रिटेवाडी पोहोच रस्ता लवकरच पूर्ण होणार आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेला रिटेवाडी रस्ता लवकरच पूर्ण होऊन सर्वांसाठी खुला होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 15 75 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद असलेल्या रिटेवाडी पोहोच रस्त्यासाठी 1 कोटी 46 लाख रुपयांची निविदा पुनर्वसन विभागाकडून जाहीर झालेली होती. प्रत्यक्षात 11 टक्के बिलो प्रमाणे 1 कोटी 29 लाख रुपये निधी मंजूर होऊन या कामास प्रारंभ झाला. रिटेवाडी हे गाव बागायत क्षेत्रांमध्ये येत असल्यामुळे या गावातून मुख्य रस्त्याला म्हणजेच झरे फाटा ते पारेवाडी या रस्त्याला सतत वाहतूक होत असते .त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवावी अशा आशयाचे पत्र 23/ 11/ 2020 रोजी सरपंच दादासाहेब कोकरे यांनी आपल्याला दिले.
त्या पत्रानुसार आपण पुनर्वसन शाखेचे उपायुक्त यांना रिटेवाडी पोहोच रस्त्याची रुंदी 5 मीटर ऐवजी 10 मीटर मीटर करावी तसेच डांबरीकरण 5 ते 7.5 मीटर ठेवावे अशी मागणी केली. सदर मागणीनुसार या कामासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज होती. दरम्यान प्रशासकीय मान्यता मिळून तांत्रीक मान्यता मिळेपर्यंत काम थांबू नये म्हणून आपण कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून मान्यतेपूर्वीच कामाची रुंदी वाढवणे व चढ खाली बसवणे ही कामे अगोदरच करायला लावली.
दरम्यान 22/02/2022 रोजी महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयान्वये रिटेवाडी रस्त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु त्यास तांत्रिक मान्यता मिळणे बाकी असल्यामुळे यासंदर्भात 05/05/2022 रोजी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार साहेब यांच्याकडे रिटेवाडी पोहोच रस्त्याच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळावी अशी विनंती केली होती. त्यानुसार सदर रस्त्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होऊन हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
