राजकीय

जिल्हा परिषद पंचायत समिती समिती निवडणुका पुढे ढकलल्या आरक्षणाला स्थगिती नव्याने प्रकिया

      जिल्हापरिषद पंचायत समिती समिती निवडणुका पुढे ढकलल्या असुन आरक्षणाला स्थगिती नव्याने प्रकिया सुरू होणार आहे.                                        5ज्ऑगस्ट 2022 रोजी 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांमध्ये जागांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे 08 ऑगस्ट 2022 रोजी 13 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बुथनिहाय अंतिम मतदार यादी जारी करण्यात येणार होती. तसेच प्रारुप मतदार यादी 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 10 ऑगस्ट 2022 रोजी जारी करण्यात करण्यात येणार होती जिल्हा परिषद पंचायत समित्या अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करून त्याद्वारे जिल्हा परिषदांच्या एकूण जागांची संख्या बदलली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत केलेल्या सीमांकन आणि आरक्षणाच्या सर्व प्रक्रिया रद्द केल्या आहेत आणि अशी प्रक्रिया नव्याने सुरू केली जाईल अशी तरतूद केली आहे.आतापर्यंत केलेल्या सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आणि आरक्षणासाठी किंवा मतदार याद्यांसाठी अंतिम अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा करण्याचे निर्देश दिले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group