Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीय

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखेचा राजुरीत शुभारंभ

 

करमाळा प्रतिनिधी  राजुरी तालुका करमाळा येथे 13/12/21 सोमवार रोजी सकाळी 10वाजता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष adv.सुप्रियाताई गुंड पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील महिला वर्गात व तळागाळातील उपेक्षित जनतेपर्यंत पोहोचवणे हेच पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे .याच माध्यमातून महिलांचे सबलीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व प्रचार करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.यावेळी प्रास्ताविक करमाळा विधानसभा महिला अध्यक्ष adv.वर्षाताई साखरे केले, त्यांच्या निवडीबद्दल राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, जिल्हा सरचिटणीस श्री गौरव झांजुरणे, जिल्हा सरचिटणीस सौ.विजयमाला चवरे , महिला तालुकाध्यक्ष सौ नलिनी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी या शाखेच्या अध्यक्षपदी सौ अर्चना गणेश जाधव तर उपाध्यक्षपदी मोहिनी अमोल दुरंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सौ कोमल साखरे, वैशाली जगताप ,मोहिनी साखरे ,मंगल सराटे ,सुरेखा सारंगकर ,महानंदा टापरे यांच्यासह आर. आर. बापू साखरे, नंदकुमार जगताप, दिलीप सारंगकर, मनोज शिंदे ,उदय साखरे, गणेश जाधव, मारुती साखरे सर, ज्ञानदेव दुरंदे,आजिनाथ दुरंदे,श्रीकांत साखरे ,अमोल दुरंदे ,दीपक साखरे, महादेव दुरंदे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group