लोकमंगलचे पिग्मी एजंट किशोर ढाळे यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील वेताळपेठेतील जेष्ठ नागरिक लोकमंगल नागरी सह बॅंकेचे पिग्मि एंजट किशोर चंद्रकांत ढाळे वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मृत्युपश्चात पत्नी भाऊ भावजय पुतण्या असा परिवार आहे.मनमिळावु प्रामाणिक प्रेमळ हसतमुख असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे लोकमंगल व ढाळे परिवाराचे नुकसान झाले असुन त्यांच्या अचानक निधन झाल्यामुळे लोकमंगल पतसंस्थेच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी मॅनेजर रमण परदेशी अजय शिंदे कमलेश ससाणे, कोकाटे ,प्रसाद पंलगे ,सौ वनारसे ,उपस्थित होते. त्यांच्या सांयकाळी साडेसात वाजता करमाळा येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन अंत्ययात्रा राहत्या घरापासुन वेताळपेठेतुन निघणार आहे.
