करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान संगोबाच्या आदिनाथ मंदिराचा जिर्णाध्दाराचे काम सुरु भाविकाना मदतीचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सकळ सिद्धांचा गुरु करमाळा येथील जागृत देवस्थान असलेले संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिर पुरातन असून या मंदिराचे बांधकाम कालानुसार झालेले आहे या मंदिराचे अस्तित्व आबादीत राहून या मंदिराचा ऐतिहासिक पौराणिक वारसा जपण्यासाठी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम बोरगाव येथील सरपंच विनय ननवरे ग्लोबल सायन्स इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष महेश निकत सर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष सुशील नरूटे यांनी आदिनाथ महाराजांच्या मंदिराचे सूशोभिकरण जीर्णोद्धार कार्यक्रम हाती घेतला आहे या मंदिराचे काम लोकसहभागातून व लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे करमाळा तालुक्यातील प्रत्येक भाविक भक्तांचा यामध्ये सतपात्री दान म्हणून वाटा असावा या उद्देशाने लोकसहभागातून व लोकवर्गणीतून काम करण्याचा संकल्प या मंडळींनी केला आहे तरी आदिनाथ महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार कामासाठ सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान आदिनाथ महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या मंदिराच्या बांधकामासाठी व जीर्णोद्वारासाठी ज्या भाविक भक्तांना वर्गणी द्यायची आहे त्यांनी 98 60 87 82 34 या नंबर वर गुगलवर फोन पे द्वारे ही पैसे पाठवण्याची सुविधा करण्यात आली आहे याचबरोबर अधिक माहितीसाठी विनय ननवरे मोबाईल नंबर 98 50 11 11 31 महेश निकत सर 9860878234 ,सुशील नरूटे सर 96 37 77 15 15 या नंबर वर संपर्क साधून या धर्म कार्यास सहभागी होण्याचे आवाहन आदिनाथ महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


