Friday, July 31, 2026
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथील डॉक्टर शुभांगी ओंकार पोटे केकान यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

करमाळा प्रतिनिधी करमाळा  तालुक्यातील शेलगाव (वा) येथील डॉ. शुभांगी ओंकार पोटे- केकान या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे माहेर वंजारवाडी हे आहे. त्यांचे पती स्टेट बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांनी करमाळा व जेऊर येथील शाखेतही काम पहिले होते. सध्या ते नगर येथे कार्यरत आहेत.
डॉ. शुभांगी यांचे प्राथमिक शिक्षण वंजारवाडी येथे झाले आहे. त्यानंतर मध्यमिक शिक्षण करमाळा येथे झाले तर पुढील शिक्षण नाशिक येथे झाले आहे. त्यांनी बीडीएस शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रॅक्टिस सुरु केली. दरम्यान त्यांनी बारामती येथे दवाखाना सुरु केला होता. मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांनी प्रॅक्टिस बंद करून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे. त्यांनी कोणताही क्लास लावलेला नव्हता. सध्या त्या बारामती येथे राहतात. त्यांना सहा वर्षाचा मुलगा. सध्या त्या प्रक्टिस करत नाहीत अभ्यासासाठी दवाखाना त्यांनी बंद केला होता. त्यांचे पती हे सध्या नगर येथे नोकरी करत आहे  त्यांनी मिळवलेले यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!