Tuesday, September 29, 2026
Latest:
करमाळा

उद्योजक शिवकुमार चिवटे यांच्या धर्म पत्नी सौ..ऋतुजा हिंगमिरे(चिवटे)यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)पदी निवड

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्रा मध्ये TCS द्वारे घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी पदांसाठी(तलाठी) सरळ सेवा परीक्षा झाली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून विविध प्रवर्गांसाठी एकूण १९७ जागा होत्या. सौ.ऋतुजा हिंगमिरे (चिवटे) यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून निवड झाली आहे. त्या मुळ तासगाव जि.सांगली येथील असून त्यांचा विवाह करमाळ्यातील मिठाई चे सुप्रसिद्ध व्यापारी सूर्यकांत चिवटे यांचे मोठे चिरंजीव शिवकुमार यांच्याशी झाला असून त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. त्या बीएससी पदवीधर असून त्यांचा पदवीधर झाल्यानंतर लगेच विवाह झाला होता.त्यांच्या यशासाठी पती,आई,वडील सासू,सासरे यांचा मोलाचा वाटा आहे.ऋतुजा हिंगमिरे (चिवटे) या सध्या विवाह झाल्यापासून गृहिणी म्हणूनच जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ते घरची जबाबदारी पार पाडत उरलेल्या वेळेत त्या अभ्यास करत असे.त्यातूनच त्यांनी ग्राम महसूल अधिकारी पदासाठी (तलाठी)ची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातून दिली होती. तसेच त्यांचे पती देखील त्यांचा पारंपारिक व्यवसाय बघत भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्यासोबत दुधापासून बनवणाऱ्या पदार्थांचा व्यवसाय सांभाळत आहेत. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे माजी कक्ष प्रमुख रुग्णसेवक मंगेश चिवटे व कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन व शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे यांच्या माध्यमातून ते देखील गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळवून दिले आहेत. चिवटे परिवारातील पहिलीच व्यक्ती प्रशासकीय सेवा बजवणार असल्यामुळे त्यांचे कुटुंबात सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच ऋतुजा यांच्या यशासाठी त्यांचे मंगळवेढा येथील वठारे मामा व त्यांचे स्नेही कामती ता.मोहोळ येथील कस्तुरे मामा यांचे देखील विशेष सहकार्य लाभले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!