करमाळा

श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सालाबादाप्रमाणे भव्य-दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन-गणेश (भाऊ) चिवटे

करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित सालाबाद प्रमाणे चालू वर्षी ही भव्य-दिव्य स्वरूपात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे,अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.                                          पुढे बोलताना ते म्हणाले की गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत लावून देत आहोत.सन 2023 मध्ये 21 व सन 2024 मध्ये 31 विवाह सोहळे आम्ही यशस्वी पार पाडले आहेत.या वर्षी आमचे हे तिसरे वर्ष असून आम्ही 28 विवाह श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणार आहोत.या विवाहामध्ये वधू-वरांना आवश्यक त्या माना पानाच्या सर्व सुविधा देणार आहोत.तसेच या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकीय व धार्मिक श्रेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या विवाह सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील वधू- वरांनी जि.एन .सि मिल्क सेंटरच्या करमाळा, कोर्टी, वरकुटे, घारगाव येथील केंद्रावर तसेच गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालय व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दत्तपेठ करमाळा येथे नोंदणी केली आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान गणेश चिवटे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group