Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

अंजनडोह येथील असंख्य कार्यकर्त्यांचा संजय मामा शिंदे गटाला राम राम करत कंदर येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत बागल गटात जाहीर प्रवेश….बागल गटात प्रवेश सत्र सुरू

 

करमाळा प्रतिनिधी 
अंजनडोह येथील युवा नेते उमेश रणदीवे, आप्पा रणदिवे,ज्ञानेश्वर रणदीवे यांच्यासह ४० प्रमुख कार्यकर्त्यांचा शिंदे गटाला राम राम करत मकाईचे मा.चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत कंदर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बागल गटात जाहीर प्रवेश केला.मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बागल गट प्रणीत भारतीय जनता पक्षात सर्व मतभेत विसरुन गावोगावी होणाऱ्या प्रत्येक मेळाव्यात प्रवेश करणारांची संख्या वाढत चालली आहे.करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दुरावलेल्या सर्व सहकार्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार करत रश्मी दिदि बागल यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल करतआहेत.

यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तसेच सोगाव ग्रा.पंचायत मा.सरपंच कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक कैलास पाखरे यांनी वाशिंबे येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तर शेटफळ येथील मेळाव्यात रामवाडीचे मा.सरपंच संतोष वारगड,जिंतीचे अंकुश महाराज खराडे, सिकंदर शेख, तसेच निमगाव ह.येथील मेळाव्यात हिवरेचे मा. सरपंच बापू फरतडे, यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी भाजप नेते दिग्विजय बागल,कृषि उत्पन्न बाजार समिती मा.सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, मा. उपसभापती चिंतामणी जगताप, संतोष वारगड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर,मा.सभापती शिवाजीराव बंडगर,मा.उपसभापती चिंतामणी जगताप,आदिनाथचे मा. व्हाईस चेअरमन.नानासाहेब लोकरे,रंगनाथ शिंदे, कुलदीप पाटील,उद्धव भोसले,बापूमामा कदम,सुभाष पवार,नवनाथ बागल,सतिश नीळ,अजित झांजूर्ने,रेवन्नाथ निकत,अशिष गायकवाड,राजेंद्र मोहोळकर गणेश तळेकर , पै.अनिल शिंदे, अशोक पाटील,महेश तळेकर,विलास काटे,डॉ.विजय रोकडे,युवराज रोकडे,अँड.सोनवणे,अँड.जयदीप देवकर,सचिन पिसाळ, माजी सभापती लक्ष्मण महाडिक,रावू काका देशमुख,स्वप्निल गोडगे,युवराज मगर, बाळासाहेब पराडे, धर्मराज लोकरे, सागर शिंदे,कुबेर शिंदे,मच्छिंद्र वागज, बंकट शिंदे, आण्णासाहेब शिंदे, सुभाष पवार, वि.का.सोसायटीचे चेअरमन आबा लोकरे, अरुण सरडे, विलास लोकरे, परशुराम शिंदे, संतोष माने, भैरवनाथ डोके, ब्रह्मदेव आरकीले,गोवर्धन माने, सोमनाथ माने, रवी माने, पांडुरंग पराडे, विवेक भोसले, वैभव पराडे, विजय माने, लालू जहागीरदार, शामिद भाई इनामदार, मुदूभाई जहागीरदार, मधुकर भगत, राजकुमार लांडगे, माजी सरपंच धर्मराज जगताप, आजिनाथ जगताप, दत्ता मामा साळुंखे, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर शिंदे यांनी केये तर सुभाष पवार यांनी मानले.

चौकट
बागल गटापासून दूरावलेले गावपातळीवरील अनेक प्रमुख कार्यकर्ते फोन करुन तर अनेक जन प्रत्यक्ष भेट घेऊन रश्मी दिदि बागल यांना विधानसभेत पाठविण्यासाठी स्व.बागल मामांच्या विचारधारेला मानून काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.अशा सर्व हितचिंतकांना येत्या काळात बरोबर घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रिटेवाडी उपसा सिंचन योजना,एमआयडीसी,मांगी तलाव,केम वडशिवने उपसा सिंचन, सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप होणे,उजनी जलाशयावरील पूल,आरोग्य,रस्ते, ववीज अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी प्रवेश करणार

श्री.दिग्विजय दिगंबरराव बागल.
मा. चेअरमन मकाई सहकारी साखर कारखाना

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group