छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अवमानाचे प्रायश्चित करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुंधाशु त्रिवेदी यांचा निषेध करण्यासाठी 7 डिसेंबरला शिवभक्ताच्यावतीने करमाळा बंदचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुंधाशु त्रिवेदी यांनी आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून बेताल वक्तव्य केले आहे.या गोष्टीचा निषेध करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्रिवेंदीचे पुतळा दहन करून निषेध करण्यात आला आहे..लोकशाहीत आतापर्यत हे चालत आले आहे . मात्र या शासनाने आम्हा शिवभक्तांवर गुन्हा दाखल करुन शिवभक्तांचा अवमान केला आहे .आम्ही छत्रपतीचा अवमान सहन करणार नाही जोपर्यंत राज्यपाल त्रिवेंदी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालु राहणार असुन शिंदे भाजप सरकार शिवप्रेमी आहे का आता उघड होणार असुन शासनाचा निषेध करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी 7 डिसेंबर रोजी करमाळा बंदचे आवाहन करमाळा शहर व तालुक्यातील शिवभक्तांच्यावतीने सोशल मिडियाद्वारे करण्यात आले आहे.
