मांगी तलाव कुकडीच्या पाण्याने भरुन देण्याच्या मागणीसाठी युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्ता रोको आंदोलन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उत्तर भागाला वरदान असलेले मांगी तलाव कुकडीच्या पाण्याने भरून घ्यावा यासाठीयुवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी अकरा वाजता मांगी येथे रस्ता रोको आंदोलन आहे यासाठी मांगी तलाव लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे सध्या कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे भरली असून आता पाणी आले तरच तलाव भरू शकतो अन्यथा तलावात पाणी येणे कठीण आहे यासाठी तीव्र आंदोलन होणे गरजेचे आहे त्यामुळे पोथरे, निलज, करंजे, बिटरगाव, भालेवाडी धायखिंडी, मिरगव्हन, या भागातील सर्व शेतकऱ्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता मांगी येथील नगर हायवे येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
