Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळा

मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या दिवशी चिमुकल्यांचे सुजित (तात्या) बागल यांच्यातर्फे अनोखे स्वागत


करमाळा प्रतिनिधी मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात करण्यात आली. यावेळी नुकतेच पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना गुलाब पुष्प ,मिठाई व खेळणी वाटून सत्कार करण्यात आला.
नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली असूनही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सुजित तात्या बागल यांनी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कवले गुरुजी , शिक्षिका,सौ सुवर्णा महामुनी ,सौ पवार मॅडम ,सौ देमुंडे मॅडम.शालेय व्यवस्थापन कमिटीचे उमेश बागल , निखिल बागल , पोलीस पाटील आकाश शिंदे ,किशोर बागल , शिवाजी राऊत .यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.            यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांनी जाहीर केले की मांगी येथील प्राथमिक शाळेमध्ये जे पालक त्यांचे मुलांना पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेतील त्यांची पूर्ण एक वर्षाची घरपट्टी स्वतः भरणार , जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वर्षांनवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी
कमी होत असल्यामुळे शाळेचे वर्ग बंद पडत आहेत.परंतु असे उपक्रम राबवल्यास नक्कीच प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढेल अशी त्यांना आशा आहे.या त्यांच्या सामाजिक कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे..

error: Don\'t try to copy. Content is protected !!