समरसता साहित्य परिषदतर्फे २९ जून रोजी बहुभाषिक कवी संमेलन

करमाळा प्रतिनिधी:- समरसता साहित्य परिषद, सोलापूर शाखेच्या वतीने रविवार दिनांक २९ जून, २०२५ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, सोलापूर येथे समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे सहकार्यवाह सुहास घुमरे, स. सा. प पिंपरी चिंचवड अध्यक्ष मानसी चिटणीस, संस्थेचे अन्य राज्य पदाधिकारी, प्रमुख पाहुणे लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, सोलापूरचे कवी माधव पवार, साबीर सोलापूरी, प्रा. धन्यकुमार बिराजदार, देवेंद्र औटी यांच्या उपस्थितीत बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘
राष्ट्रभक्ती व सामाजिक समरसता’ या विषयावर आधारित या कवी संमेलनात धाराशिव, सोलापूर, चिपळूण, पुणे व अन्य जिल्ह्यातील मराठी, कन्नड, हिंदी, तेलुगू भाषिक कवी उपस्थित राहणार आहेत. ज्या नवोदित कवींना या कवी संमेलनात आपल्या कविता सादर करावयाच्या आहेत त्यांनी प्रा. माधव कुलकर्णी (9623791479) यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. या बहुभाषिक कवी संमेलनाचा आस्वाद सोलापुरातील रसिक श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी यांनी केले आहे.


