वडगाव उत्तर दक्षिणचे जनतेचे सरपंच चंद्रकांत काळे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व
करमाळा प्रतिनिधी वडगाव दक्षिण उत्तर सरपंच म्हणून निवड झालेली चंद्रकांत काका काळे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून करमाळा तालुक्यात उदयास आले आहेत .सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही जनसेवेचा ध्यास असलेले चंद्रकांत काळे यांनी सुरुवातीला शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव देण्यासाठी संतोषी माता दुध संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक हातभार लावण्यासाठी दूध डेअरी ची स्थापना केली शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी आणल्यामुळे वडगाव उत्तर मध्ये चंद्रकांत काळे यांचे नाव समाजकारणात व राजकारणात जनसामान्यांमध्ये रूढ झाले आहे .
कुठला गट कुठला पक्ष यापेक्षा जनतेच्या हितासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांनी सर्व नेत्यांशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध जपले आहे. मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांचे ते जिवलग मित्र असून सख्ख्या भावाप्रमाणे प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत असतात. शेती व्यवसायाबरोबरच दूध व्यवसायामध्ये त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला असून कौटुंबिक जीवनामध्ये ही ते सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत .त्यांच्या धर्मपत्नी सौ रेखा चंद्रकांत काळे यांची वडगाव उत्तर च्या सरपंच पदी जनतेने बिनविरोध निवड केली आहे ही चंद्रकांत काळे यांच्या केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांच्या कामावरून दिसून येते. धर्म जात पंथ यापेक्षा माणुसकी हा धर्म पाळून प्रत्येकाच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना निर्माण करून जन माणसांमध्ये सर्वसामान्यांचा काम करणारा नेता म्हणून चंदूकाका काळे यांनी एक आपली ओळख निर्माण केली आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण व समाजकारणाच्या ठिकाणी समाज कार्य अशा पद्धतीने कुठलाही दुजाभाव न बाळगता प्रत्येक गटाच्या सुखदुःखाच्या कार्याला ते आवर्जून उपस्थित राहतात त्यामुळे प्रत्येकाला चंदूकाका काळे हे आपलेसे वाटतात. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजप शिवसेना राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना गट काँग्रेस सावंत गट पाटील गट शिंदे गट बागल गट या सर्व गटातटाच्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार झालेला आहे करमाळा तालुक्यात प्रथमच एका सरपंच पदी नियुक्ती झाल्यानंतर सर्वपक्षीय कडून होणारा सत्कार हे खऱ्या अर्थाने त्यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची एकमेव उदाहरण आहे. आपण आपली काम प्रामाणिकपणे केल्यानंतर जनता नक्कीच आपल्याला साथ देते याचे चंद्रकांत काळे यांचे उत्तम उदाहरण आहे. चंद्रकांत काळे सावंत गट व आमदार नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना दोन मुले असून एक मुलगा शेती दूध डेरी सांभाळत असून दुसरा मुलगा उद्योजक असून त्यांची सून मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून चंदुकाका काळे यांनी प्रगतशील बागायतदार दूध व्यवसायिक उत्तम राजकारणी म्हणून म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चंद्रकांत काळे यांची भूमिका निर्णायक ठरणार असून त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा


