करमाळा तालुक्यात कमळ फुलणार प्राध्यापक रामदास झोळ कन्हैयालाल देवी सूर्यकांत पाटील यांनी केला मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश ….
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर, अर्बन बँकेचे चेअरमन देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील यांनी भाजपचे मा. प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ.रश्मी दीदी बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम घराघरापर्यंत पोचून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब , पालकमंत्री जयकुमार गोरे , माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार असल्याचे प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली असून गटातटाच्या राजकारणामध्ये अडकलेली नेतेमंडळी भाजपमध्ये आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाजप सत्ता काबीज करणार असा विश्वास प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.


