Tuesday, November 3, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पिसे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शारदा पिसे या नामदेव शिंपी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पिसे यांच्या पत्नी, तसेच अंकुश सुरेश पिसे आणि उद्योजक संतोष सुरेश पिसे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांनी पिसे कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर करमाळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!