करमाळ्यात आधुनिक काळातील श्रावणबाळ पाहिले : महिला काॅग्रेस जिल्हाध्यक्षा- शाहीन शेख*
करमाळा प्रतिनिधी श्री.चिंतामणीदादा,राहुलभैय्या व प्रताप यांना पाहुन ते आधुनिक काळातील श्रावणबाळ असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय सोलापुर जिल्हा महीला काँग्रेस आयच्या अध्यक्षा तथा मोहोळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शाहीनताई शेख यांनी केले.त्या श्रीमती रत्नप्रभा नामदेवरावजी जगताप यांचा ६१ वा वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याच्या लोकप्रिय माजी.आमदार श्रीमती शामलताई बागलमामी होत्या.पुढे बोलताना शाहीनताई शेख म्हणाल्या कि या घरगुती कार्यक्रमास मला तुम्ही आमंत्रित केले याचाच मला खुप आनंद आहे…आज बाईसाहेबांचा 61 वा वाढदिवस साजरा होत असताना मलाही याचा खुप आनंद होत आहे.चिंतामणीदादा,
राहुलभैय्या व प्रतापराव अश्या सुपुत्रांनी स्व.नामदेवराव जगताप व रत्नप्रभा जगताप यांच्या पोटी जन्म घेतला हे खुप भाग्याचे जरी असले तरी ते तिघे मिळुन आपल्या आईची करत असलेली देखभाल व सेवा हे पाहुन खरच मला हे तिघेही आधुनिक काळातील श्रावणबाळ वाटत असुन चिंतामणीदादा, राहुलभैय्या व प्रताप या तिघांचेही कौतुकास्पद कार्य पाहुन आपल्यापोटी अशी रत्न जन्माला आली याचा साहेबांना सुध्दा हेवा वाटत असेल.असे शेवटी शाहीन शेखमॕडम यांनी मत व्यक्त केले.माजी आमदार शामलताई बागल यांनी बागल कुटुंबाच्या वतीने बाईसाहेब यांचा सत्कार केला.व पुढील भावी आयुष्यासाठी अनमोल अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषेदेच्या सदस्या सौ.राणीताई वारे , नगरसेविका सौ.राजश्रीताई माने,माजी नगरसेविका सविताताई कांबळेसह शेकडो महीला उपस्थित होत्या. मोठ्या उत्साही वातावरणात हा वाढदिवसाचा सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.कार्यक्रम पार पाडण्यासाठी अमोल पवार,सुजय जगताप,सचिन कटारिया,उत्तरेश्वर सावंत,दिपक पडवळे,नितीन चिंचकर,योगेश राखुंडे,विजय तळेकर,गणेश फलफले,नितीन चोपडे,राहुल जाधव,निखिल कदम,संदेश माळवे यांनी परिश्रम घेतले.
