Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

पुस्तके आपल्या जीवनाला आकार देतात :- ह.भ.प .जोगदंड महाराज पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी पुस्तके आपल्या जीवनाला आकार देतात, घडवतात विचार करण्याची शक्ती आणि जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात म्हणून लोकांनी वाचनाची सवय वाढविणे गरजेचे आहे,पुस्तकाला आपल्या जिवनात अनन्य साधारण महत्त्व आहे असे मत ह. भ. प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज पंढरपूरकर यांनी व्यक्त केले राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे “जागतिक पुस्तक दिनाचे” औचित्य साधून त्यांनी वाचकांना मार्गदर्शन केले यावेळी केशव जाधव, बप्पा शिंदे, अशोक शिंदे, सुभाष काळे, माणिक शिंदे, भागवत बर्डे, बाळासाहेब कानडे, बाबासाहेब बुधवंत ,परकांडे, राहुल पवार,अशोक बुधवंत, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group