जामा मस्जिद येथे सावंत गटाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील जामा मस्जिद येथे आज मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टी चे आयोजन सावंत गटाच्या वतीने करण्यात आले होते
यावेळी झालेल्या रोजा इफ्तार पार्टीत नगरसेवक संजय सावंत .पंचायत समिती चे सदस्य अॅड राहुल सावंत, सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत, नगरसेवक अल्ताफ शेठ ताबोंळी, नगरसेवक राजू आवाड, करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, बहुजन विकास संस्था करमाळा चे अध्यक्ष इसाक पठाण, मुस्लिम विकास परिषद चे अध्यक्ष हाजी फारूक बेग, देवा लोंढे,हाजी आतिक बेग ,पप्पु सुर्यवंशी, नागेश उबाळे,आनंद रोडे जामा मस्जिद चे विश्वस्त हाजी उस्मान सय्यद जमीर सय्यद आदी जण उपस्थित होते
यावेळी जामा मस्जिद ट्रस्टचे वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सावंत म्हणाले की इस्लाम धर्मांत रमजान महीन्याला अधिक महत्त्व आहे, इस्लाम धर्म हा अमन सुखशांती चा संदेश देणारा धर्म आहे यावेळी रमजान महिन्याच्या निमित्ताने व रमजान ईद च्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
या रोजा इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी वाजीद शेख, मजहर शेख, अकबर बेग, साजीद बेग ,मतीन शेख, जावेद शेख, पै समीर शेख, अशपाक पठाण ,खलील मुलाणी ,जिलानी खान, फिरोज बेग आदी जणांनी परिश्रम घेतले.
