करमाळ्यात दिव्यांगाना मोफत कृत्रिम पाय, हात, कॅलिपर व व्हीलचेअर वाटप शिबीर संपन्न
करमाळा प्रतिनिधी भारत विकास परिषद करमाळा, सक्षम करमाळा व क्रिएटिंग होप्स कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अपंग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स, व्हीलचेअर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जवळपास शंभर दिव्यांग बांधवांना कृत्रिम जयपूर फूट, हात, कॅलिपर्स बसविण्यात आले व व्हीलचेअर देण्यात आल्या.दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. करमाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये दिव्यांग बांधवांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी भारत विकास परिषद सदैव तत्पर राहील,अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी चितळे यांनी दिली.तसेच भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, भारत विकास परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे त्याबरोबरच करमाळा तालुक्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी आमचे यापुढे देखील सदैव सहकार्य राहील.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रविणाताई ओस्वाल, अपंग कल्याण केंद्र प्रमुख विनय खटावकर, भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र सचिव अभय चोक्सी, सामाजिक कार्यकर्ते श्रेनिक खाटेर, यश कल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील, भाजपा चे गणेश चिवटे, भारत विकास परिषदेचे करमाळा चे अध्यक्ष मिथिल राजोपाध्ये, सचिव अमरजित साळुंखे, संजय गांधी योजनेचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर, सिनेट सदस्य दीपक चव्हाण, डॉ.अमोल घाडगे,लक्ष्मण केकान, सचिन साखरे, नितीन आढाव, श्याम सिंधी, बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होतेया कार्यक्रमासाठी आवर्जून बार्शी येथील भारत विकास परिषद चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तर आभार अमरजित साळुंके यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षम चे गहिनीनाथ नलवडे,निलेश जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी, संतोष कांबळे, उमेश बनकर, सागर दळवी, विनायक दाभाडे, सुरज मिसाळ, दयानंद बंडगर, महेश शहाणे, प्रेम परदेशी, सौरभ शिंगाडे, मनोज कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
