Tuesday, April 7, 2026
Latest:
Uncategorized

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ISRO हैदराबादला शैक्षणिक भेट

भिगवण प्रतिनिधी : “दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स” च्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे ५० विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक दौरा नुकताच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (NRSC) येथे आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यात विद्यार्थ्यांना । SRO च्या उपग्रह डेटा प्रक्रिया, पृथ्वी निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय मॉनिटरींगसंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी NRSC च्या उपग्रह ग्राउंड स्टेशन, डेटा प्रोसेसिंग केंद्रे आणि उपग्रह एकत्रीकरण क्षेत्रे पाहिली. तसेच, ISRO च्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून उपग्रह डेटा संकलन, प्रक्रिया आणि विश्लेषणाच्या प्रक्रियांबद्दल सखोल माहिती मिळवली. या दौऱ्यात शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.या दौऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात नवा दृष्टिकोन मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. अशा शैक्षणिक दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात वृद्धी होते आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळते.या दौऱ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळविणे, नियोजन, विद्यार्थ्यांची निवड व संपूर्ण आयोजन हे काम प्रा. उषादेवी पाटील आणि प्रा. सचिन बेरे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉ एस ए पाटील यांनी नमूद केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!