करमाळा

स्नेहालय इंग्लिश स्कूलमध्ये सुधारित अभ्यासक्रम सीबीएसई प्रशिक्षण पूर्ण…


करमाळा प्रतिनिधी 20 जून रोजी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे सुधारित अभ्यासक्रम National curriculum framework (NCF) तसेच National education policy (NEP) अन्वये सीबीएसई अंतर्गत नवनीत प्रकाशन यांच्या मार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत, शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी नवनीत प्रकाशनाचे सोलापूर विभाग प्रमुख प्रकाश शिंदे सर यांनी शिक्षकांना सीबीएसई बोर्ड विषयी मार्गदर्शन केले. तसेच कॉलेज विभाग प्रमुख संदीप पाटील यांनीही सर्व शिक्षकांना सीबीएसई अभ्यास क्रमाविषयी माहिती सांगितली.त्याच्या समवेत कॉलेज विभाग प्रमुख रविकुमार फताटे तसेच विभाग प्रतिनिधी विनायक गायकवाड हे ही उपस्थित होते.या कार्यशाळेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!