समुपदेशक फेरी घेऊन प्रवेशाची अंतिम मुदत वाढवावी- प्रा.रामदासजी झोळ सर
प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे
समुपदेशक फेरी घेऊन प्रवेशाची अंतिम मुदत वाढवावी अशी मागणी असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट आॅफ अन्एडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिआ महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ सर यांनी केली आहे.
असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट आॅफ अन्एडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिआ हि संघटना विद्यार्थ्यांचे व शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करते त्यानुसार इयत्ता 10 वी व 12 वी यांच्या झालेल्या पुनर्रपरिक्षेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता 11 वी व पदवी अभ्यासक्रमासाठी एक ज्यादा प्रवेश फेरी घेण्यात आली त्याच पद्धतीने समुपदेशक फेरी घेऊन प्रवेशाची मुदतवाढ द्यावी या मागणीचे पञ असोसिएशनच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिले आहे.
पदविका औषधनिर्माणशास्ञ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये रिपोर्टिंगचे प्रमाण 35% दरम्यान असुन दुसर्या फेरीच्या वेळी रिपोर्टिंगचे प्रमाण 30% पर्यंत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कॅप राऊंड मधिल 30-35% जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे कारण कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बरेचशे विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयास प्रवेश घेण्यास पसंती देत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये पदविका औषधनिर्माणशास्ञ या अभ्यासक्रमास मागील वर्षापेक्षा 40% जास्त अर्जाची संख्या असुन देखिल केवळ दोन प्रवेशाच्या फेर्या घेतल्याने प्रवेश फेरीतील शासकीय रिक्त जागांची संख्या जास्त असणार आहे, म्हणुन गरीब, शेतकरी, गरजुवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असुन या विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर प्रवेश घ्यावा लागत आहे.
जागा वाटपाच्या पहिल्या फेरीमध्ये असे लक्षात आले कि, पहिल्या फेरीमध्ये जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची जागा निश्चित केली नाही त्याचे कारण म्हणजे यातील सीईटीला चांगले गुण असणारे विद्यार्थी पदवी औषधनिर्माणशास्ञ महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत त्यामुळे सदर पदवी औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयास प्रवेश घेण्याची मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत आहे, त्यामुळे पदविका औषधनिर्माणशास्ञ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुदत 31 जानेवारी 2021 करण्यात यावी अशी मागणी प्रा.झोळ सर यांनी केली आहे.
त्यामुळे पुनर्रपरिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व पहिल्या दोन फेरीमध्ये प्रवेशाच्या जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक फेरी घ्यावी व प्रवेशाची मुदत 31 जानेवारी 2021 करण्यात यावी अशी मागणी प्रा.झोळ सर यांनी केली आहे.
